Crime News : गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये घरगुती हिंसाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहेय. या घटनेत पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी एका फ्लॅटला आग (Fire) लागल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. आग विझवताना जखमी पत्नीला बाहेर काढण्यात आले. त्यावेळई पत्नीच्या अंगावर अनेक जखमा आढळल्याने वेगळीच शंका निर्माण झाली आहे. पोलिसांनी (Gujarat Police) घटनास्थळी धाव घेत पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.
अहमदाबादच्या गोदरेज गार्डन सिटीमध्ये एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली, तर तिचा पती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. फ्लॅटला आग लागून महिलेचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला एक तास लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळी 8 वाजता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना फ्लॅट क्रमांक 405, गोदरेज गार्डन सिटी येथे आग लागल्याचा फोन आला. जेव्हा अग्निशमन विभागाचे कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा अनिल बघेल आणि अनिता बघेल नावाचे जोडपे तळमजल्यावर जखमी अवस्थेत आढळून आले. दोघांवरही चाकूने वार केल्याचे दिसत होते. वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी अनिताला मृत घोषित केले आणि अनिलला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले, असे अग्निशमन अधिकारी मिथुन मिस्त्री यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
सुरुवातीला पत्नीने पतीला थंड नाश्ता दिल्यानं वादाला सुरुवात झाली. हळूहळू वाद वाढत गेला आणि त्यातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे म्हटले जात आहे. अनिल बघेल एका कोरियन कंपनीत कार्यकारी अभियंता म्हणून काम करतात तर पत्नी अनिता दोन महिन्यांपूर्वीपर्यंत एका टाईल्स निर्मिती कंपनीत डिझाईनर म्हणून काम पाहत होती. बघेल दाम्पत्याला दोन मुले देखील आहेत. अनिल आणि अनिता यांच्यात शुक्रवारी सकाळी वाद झाला.
सकाळी ८.४० च्या सुमारास थंड नाश्ता दिल्यानं अनिल आणि अनिता यांच्यात वाद झाला. वाद झाला त्यावेळी दोन्ही मुले शाळेत होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार भांडणानंतर अनिल धावत फ्लॅटबाहेर आले त्यावेळी त्यांच्या छाती, पोट आणि हातांवर जखमा झालेल्या दिसत होत्या. त्यावेळी 'अनितानं आपल्यावर चाकूनं वार केले आणि त्यानंतर स्वत:वरही वार केले आणि घराला आग लावली, असे अनिलने सांगितले. दार आतून बंद असल्याने सुरक्षा रक्षकाला बोलवून ते तोडण्यात आले आणि अनिताला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी ती गंभीर जखमी झाली होती.
गळा, मनगट, छाती आणि पोटावर गंभीर इजा झाल्यानं अनिता यांचा मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डी. व्ही. राणा यांनी दिली. "पत्नीनं सकाळी थंड नाश्ता दिल्याचं आमच्यात वाद झाला. यावरुन अनिता चिडली आणि तिने माझ्यावर आणि स्वतःवर चाकूनं हल्ला केला. त्यामुळे मी तिला आत ढकललं. यानतंर अनिताने पीएनजी गॅस पाईप काढला आणि गॅस लायटर पेटवून आग लागली असे अनिलने सांगितले," असे डी. व्ही राणा म्हणाले.