मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाच्या (Corona Second Wave) वाढत्या संसर्गामुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कारोनाची बाधा झाली. यामध्ये अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. दरम्यान आता कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. त्यामुळे सरकारने घातलेले निर्बंध परिस्थिती पाहून काही प्रमाणात शिथिल केले आहेत. ( Crowd in mall as soon as unlocked video viral)
तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावे, असं आवाहनही सरकारतर्फे नागरिकांना करण्यात आला. पण काही अतिउत्साही नागिरकांना सरकारच्या या आवाहनाचा विसर पडल्याचं दिसतंय. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हीडिओतून आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका मॉलमधील व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मोठ्या प्रमाणावर लोकांनी मॉलमध्ये गर्दी केलेली दिसत आहे. तसेच व्हीडिओत दिसत असलेली लोकांकडून कोरोना नियमांनाही हरताळ फासल्याचं स्पष्ट होत आहे.
19000 ppl visited Pacific Mall, Subhash Nagar, Delhi
Do we really deserve to blame govt for the corona waves?
People don't deserve any price relaxation on Medicines. If they can afford to buy luxury items, they can also afford medicines too.
Say #nosubsidyforCovidmedicine pic.twitter.com/umJz9Lijho— तरंग सुखात्मे Urban Planner Architect (@ArchPlanrTarang) June 15, 2021
व्हायरल होणारा हा व्हीडिओ दिल्ली भागातील असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आम्ही या व्हीडिओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. हा व्हीडिओ दिल्लीतील सुभाष नगर येथील pacific मॉलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. तिथे उपस्थितांपैकी काही जणांचं असं म्हणणं आहे की तिथे 15 हजारांपेक्षा अधिक लोकं उपस्थित होते.
दरम्यान अनलॉकनंतर झालेल्या अशा गर्दीमुळे कुठेतरी निर्बंध पुन्हा कडक करावेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या :
Maratha Aarakshan : 'मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार'
काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता आणखी एक बुरशीचं पहिलंच प्रकरण आलं पुढे