लखनऊ : त्रिपुराचे भाजपचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा चर्चेत आहेत. कारण त्यांनी वादग्रस्त विधान केलेय. इतिहासात रामायनला महत्व आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, आता सीताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेय. सीतेचा जन्म टेस्ट ट्युबच्या माध्यमातून झाला आहे. सीताजी टेस्ट ट्युबर बेबी असू शकते, असे विधान दिनेश शर्मा यांनी केलेय. हिंदी पत्रकारिता दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शर्मा यांनी सीता यांचा जन्म मातीच्या घड्यापासून झालाय. त्यावेळी टेस्ट ट्युबच्या माध्यमातून मुलं जन्माला घालण्याची ही पद्धत होती.
मथुरामध्ये हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले पूर्वापार पत्रकारिता सुरु आहे. त्याला ऐतिहासिक महत्व आहे. महाभारतापासून पत्रकारिता सुरु आहे. नारद हा पहिला पत्रकार होता, असेही अक्कलेचे तारे त्यांनी तोडले. तसेच गुरुत्वाकर्षण, प्लास्टिक सर्जरी आणि अणूचा शोधही भारतात लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
महाभारतातील एक व्यक्तिरेखा संजय यांची आठवण सांगता म्हटले, संजय हस्तीनापूरमध्ये बसून कुरुक्षेत्रात सुरु असलेल्या महाभारतातील युद्ध पाहत होते. त्यानंतर ते धृतराष्ट्र यांना सांगत असत. हे लाईव्ह टेलिकास्ट नाही तर काय?
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब यांनीही काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. संजय आणि धृतराष्ट्र यांचा उल्लेख करत महाभारत काळात इंटरनेटचा वापर होत होता. इंटरनेटच्या माध्यमातून संजय धृतराष्ट्र यांना युद्धाची माहिती देत होते.