पाटणा : बिहारमधून क्राईम संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत, त्यात आणखी एका बातमीनं सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे. जिल्ह्यातील चकिया येथून ताजे प्रकरण समोर आले आहे. जिथे निर्भय हल्लेखोरांनी कंत्राटदार आणि त्याच्या ड्रायव्हरला गोळ्या झाडल्या गेल्या. परंतु तरी देखील ड्रायव्हरने आपल्या मालकाला वाचवण्यासाठी गोळी लागलेली असतानाही रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली. कॉन्ट्रॅक्टरने बिर्याणीचा पहिला घास हातात घेताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.
गोळ्या लागल्याने कॉन्ट्रॅक्टर गंभीर जखमी झाला, त्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरवरही गोळ्या झाडण्यात आला, त्यामुळे तोही जखमी झाला. ड्रायव्हरने लोकांच्या मदतीने कॉन्ट्रॅक्टरला गाडीत बसवले आणि रुग्णालयाच्या दिशेने गाडी वळवली. परंतु तेथेही या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला.
वाटेतही हल्लेखोरांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केला. यावेळी ड्रायव्हरला तीन गोळ्या लागल्या, तरीही त्याने कसं-बसं 40 किमीचा प्रवास पूर्ण केला आणि कॉन्ट्रॅक्टरला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी ठेकेदाराला मृत घोषित केले. त्याचवेळी गंभीर जखमी झालेल्या चालकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा देखील दबंग प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्याच्याकडे खूप पैसा होता. कॉन्ट्रॅक्टर सरोत्तर गावचा रहिवासी होता, तसेच राजकीय पातळीवरही त्याची ओळख होती.
हत्येचे कारण एका कराराशी संबंधित वाद, असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कॉन्ट्रॅक्टरच्या वेदनादायक मृत्यूनंतर नातेवाईकांसह अनेक नेते रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी तेथे उपस्थित पोलिसांना करण्यास सुरुवात केली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही घटना घडवून आणणाऱ्या टोळीची ओळख पटवली आहे आणि आता पुढील कारवाई सुरू आहे.