Viral Video: दारूच्या नशेत तरुणांचा माज... अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर!

Drunk men Car Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मद्यधुंद तरुणांनी एका व्यक्तीवर भरधाव कार चालवल्याचं दिसतंय.

Updated: Nov 9, 2022, 01:09 AM IST
Viral Video: दारूच्या नशेत तरुणांचा माज... अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर! title=
Drunk men Car Viral Video

Crime News Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) धुमाकूळ घातलाना दिसतोय. गुरुग्राममध्ये एका धक्कादायक घटनेत तरुणांनी स्टंट करणाऱ्या व्यक्तीवर भरधाव कार चालवली. कारची धडक बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 

हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुरुग्रामच्या उद्योग विहार फेज-2 मध्ये रविवारी रात्री 2 वाजता हा भीषण अपघात समोर आलाय. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मद्यधुंद पोरं कारमधून जीवघेणा स्टंट ( Car Stunt Viral Video) करत असल्याचे दिसून येतंय.

आणखी वाचा- Sapna Choudhary: भर कार्यक्रमात तरूणाचं अनैतिक कृत्य, सपनाने चांगलीच अद्दल घडवली!

सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Video) सुमारे 10-12 तरुण दारूच्या दुकानाबाहेर स्टंट करताना दिसत आहेत. स्टंट करत असताना अचानक एका एसयूव्हीचा (SUV Car) ताबा सुटला आणि ती रस्त्यावरून उभे असलेल्या लोकांना धडकली, त्यामुळे त्यातील दोघं खाली पडली. एका कचरा उचलणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघं जण जखमी देखील झाली आहेत.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, आरोपींपैकी एक उपायुक्त कार्यालयात कॉम्प्यूटर ऑपरेटर आहे, तर तीन जण एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतात. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.