जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 9, 2017, 05:32 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के title=

नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी ४ वाजून १३ मिनिटांच्या आसपास भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठं आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं कुठलंही वृत्त अद्याप आलेलं नाही

दरम्यान, गेल्या बुधवारीही दिल्लीसोबतच परिसरातील इतर सहा राज्यांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमध्ये होता.