नवी दिल्ली : देशामध्ये एक असं हॉटेल उघडलं आहे ज्यामुळे अनेकांना आनंद झाला आहे. लोकं येथे पोटभर जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
या हॉटेलची एक गोष्ट खूप खास आहे. कारण या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ शकता. पैसे देण्याची जर तुम्हाला इच्छा नाही तरी जेवण झाल्यानंतर तुम्ही पैसे न देता निघून जाऊ शकता. या भन्नाट अशा गोष्टीमुळे हे हॉटेल चांगलंच चर्चेत आलं आहे.
केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यामध्ये हे हॉटेल सुरु झालं आहे. जेथे तुम्ही तुमच्या मर्जीने पैसे देऊ शकता. जेवनानंतर जर तुम्हाला १ रुपयाही देऊ नाही वाटला तरी तरी तुम्ही निघून जाऊ शकता. 'जनकीय भक्षणशाला' म्हणजेच जनता भोजनालय असं याचं नाव आहे. याचा उद्देश 'ईट अॅस मच अॅस यू वाँट. गिव अॅस मच अॅस यू कॅन'. म्हणजे हवं तेवढं जेवा आणि जेवढी ईच्छा तेवढंच द्या. केरळ स्टेट फायनँशियल एंटरप्रायजेजच्या सीएसआर फंडचे संचालित या हॉटेलच्या मालकांना म्हणणं आहे की, त्यांना उपाशी मुक्त राज्य बनवायचं आहे. ३ मार्चपासून हे हॉटेल सामान्य लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी फेसबूकच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, जर तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही येथे या आणि जेवा. काऊंटरवर बिल घेण्यासाठी कोणताही कॅशिअर नसेल. तुम्ही येथे तुमच्या मनाचे कॅशिअर आहात. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकू शकता. तुमच्याकडे पैसे नाही तरी पोटभर जेवून तुम्ही असंच जाऊ शकता.'