Eknath Shinde महाविकास आघाडीला मोठा हादरा देणार? आणखी 10 आमदार संपर्कात

Eknath Shinde Marathi news शिवसेनेची काल वर्षा येथील बैठकीत उपस्थितीत राहीलेल्या आमदारापैंकी अजून 4-5 आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 22, 2022, 08:17 AM IST
Eknath Shinde महाविकास आघाडीला मोठा हादरा देणार? आणखी 10 आमदार संपर्कात title=

गुवाहाटी : शिवसेनेची काल वर्षा येथील बैठकीत उपस्थितीत राहीलेल्या आमदारापैंकी अजून 4-5 आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनातून 40 आणि अपक्ष असे एकूण 45 आमदारांचा पाठिंबा शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे.आता शिवसेनेतून 33 तर 7 अपक्ष अशी 40 संख्या गुहावटी येथे आहे.

आणखी 10 आमदार येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. सध्या एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आहेत. असं झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गटात 50 आमदार होऊ शकतील. 

एकनाथ शिंदे आपल्या गटासह गुवाहाटीला विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांनी आता 40 आमदार आपल्यासोबत असल्याचं सांगितलं. त्याचवेळी मराठीतून प्रतिक्रिया देताना आणखी 10 आमदार येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. आज दुपारीच शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 

स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय.