Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

Updated: Jun 17, 2022, 11:39 PM IST
Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी  title=

मुंबई : एक व्यक्ती रस्त्यानं सायकलवरून निवांत चालला होता. घरी पोहोचायला आपल्याला अजून किती वेळ लागेल याचाच विचार त्याच्या मनात होता. त्याचवेळी अचानक एका बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. मग पुढं जे झालं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पुढे काय झालं चला पाहुयात. (fact check viral polkhol sensetional video of leopard and bicycle rider) 

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला. या व्हिडीओत बघा. रस्त्यावर वर्दळ आहे. गाड्यांची रस्त्यावरून ये-जा सुरूये. त्यावेळी एक तरुण सायकलवरून रस्त्याच्या कडेनं मस्त आरामात चालला होता. याच्या काही ध्यानी मनीही नव्हतं. 

त्यावेळी डाव्या बाजूनं जंगलातून बिबट्या धावत आला. आणि याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्या जोरात धावत आल्याने त्याच्या धक्क्याने सायकलस्वार खाली कोसळतो आणि बिबट्याचा प्लॅन फसतो. आता पुन्हा एकदा पाहा. किती वेगानं हा बिबट्या याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. याचा नेम चुकल्यानं बिबट्याची फजिती झाली. 

मागून गाडीही येत असल्याने बिबट्याने पुन्हा हल्ल्याचं धाडस केलं नाही. त्यानं आल्या पावलीच धूम ठोकली. सुरुवातीला या व्यक्तीलाही नेमकं काय झालं ते कळलंच नाही. पण आपल्यावर हल्ला करणारा बिबट्या होता हे समजताच सायकल घेऊन हा पटकन उठला आणि त्यानंही पळ काढला. 

हा सगळा प्रकार घडत असतानाही बाजूनं जाणारा कारवाला काही थांबला नाही. तोही कार घेऊन निघून गेला. एका वनअधिका-यानं  हा व्हिडिओ शेअर केलाय. 

व्हीडिओ पाहताच थरकाप उडतो. या सायकलस्वाराचा आपल्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता', असं त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलंय. पण, या व्यक्तीचं खरंच नशीब बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून तो वाचलाय.