Viral Polkhol : काय सांगता आता थेट नळातून दारू घरी येणार? असा दावा कऱण्यात येतोय की, आता दारू पिणा-यांना बारमध्ये जायची आवश्यकता नाही. दारू आता नळानेच घरात येणार. हवी तेवढी दारू प्या आणि तेवढंच बिल भरा, अशी योजना आलीये. अशा आशयाचा मेसेज सध्या तुफान व्हायरल होतोय. या मेसेजमुळे दारू पिणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मात्र, आता प्रश्न असा आहे की, या दाव्यामध्ये तथ्य आहे का...?
दररोज दारू पिणाऱ्यांना पाईपलाईनचं कनेक्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दारूची पाईपलाईन घेण्यास इच्छुक असलेल्यांनी 11 हजारांचा डिमांड ड्राफ्ट अर्जासह भरून पीएमओत जमा करावा.
असा मेसेज व्हायरल झालाय. दरम्यान अर्ज प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्यानंतर घरी येऊन पाहणी केली जाईल. यानंतर मीटरसह दारूची पाईपलाईन घरापर्यंत टाकण्यात येईल. तुमचा वापर मोजून त्यानुसार तुम्हाला बिल येईल असाही दावा केलाय.
मात्र, या दाव्यात तथ्य आहे का? केंद्राने असा कोणता निर्णय घेतलाय का...? याची पोलखोल करण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. सरकारची अशी योजना आहे का हे तपासून पाहिलं. त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात.
लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल केला जातोय. गॅस प्रमाणे पाईपलाईनने दारू पुरवठा करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे पडताळणीत दारू नळाने घरी येणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे.