नवी दिल्ली : पंतप्रधानांना त्यांच्या मित्रांना फायदा करून द्यायचाय असा आरोप राहुल गांधींनी केला. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतीची भेट घेतली. यावेळी शरद पवार, राहुल गांधी, डी राजा,सिताराम येचुरी, टी आर बालू (डीएमके) हे उपस्थित होते. या भेटीनंतर राहुल गांधी बोलत होते. राष्ट्रपतींना भेटलो. या कायद्यातील त्रुटी सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले. कोणत्याही चर्चेविना शेतकी बील पास केले गेल्याचे ते म्हणाले.
शेतकरी थंडीत आंदोलनात बसले आहेत. शेतकऱ्यांनी या देशाची आधारशीला ठेवलीय. शेतकरी घाबरणार नाही. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकरी माघार घेणार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. जर हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदा आहे असं केंद्र सरकार म्हणतंय मग शेतकरी आंदोलन का करताहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीतील शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीमध्ये झालेले निर्णय
सरकारकडून प्राप्त झालेला प्रस्ताव एकमताने नामंजूर
१२ डिसेंबरपासून राजस्थान हायवे (गुडगांव) बॉर्डर जाम करणार.
१२ डिसेंबर रोजी एक दिवसासाठी सर्व टोल नाके फ्री करण्याचे आंदोलन
१४ डिसेंबर रोजी सर्व बॉर्डरवर आंदोलक एक दिवसीय उपोषण करणार
१४ डिसेंबर रोजी देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे व लक्षणीय उपोषण
सर्व शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओ सिमचा बहिष्कार करावा.