मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Agricultural law) अद्यापही आंदोलन ( Farmers Protest) सुरु आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (farmers) आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरियाणा या राज्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी (farmer) दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून (Police) आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत अश्रुधुराचा वापर केला. यावेळी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. दिल्ली-पंजाब सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Haryana: Farmers in large numbers gather near Karnal's Karna Lake area, to proceed to Delhi to protest against farm laws pic.twitter.com/uYuMQtjcVn
— ANI (@ANI) November 26, 2020
पंजाब आणि हरियाणाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पोलीस शेतकऱ्यांना रोखण्याचा जोरदार प्रयत्न करतायत. मात्र शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. ड्रोनद्वारेही त्यावर नजर ठेवली जात आहे.
केंद्र सरकार के तीनों खेती बिल किसान विरोधी हैं। ये बिल वापिस लेने की बजाय किसानों को शांतिपूर्ण प्रदर्शन करने से रोका जा रहा है, उन पर वॉटर कैनन चलाई जा रही हैं। किसानों पर ये जुर्म बिलकुल ग़लत है। शांतिपूर्ण प्रदर्शन उनका संवैधानिक अधिकार है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 26, 2020
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात (Agricultural law) पंजाबहून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकर्यांशी (farmers) पोलिसांची (Police) शाब्दीक चकमक उडत आहे. हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर अंबाला येथील शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स उखडून टाकलेत. तसेच अग्निशमन दलाच्या गाडीचा ताबा घेतला. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला.
किसानों से समर्थन मूल्य छीनने वाले कानून के विरोध में किसान की आवाज सुनने की बजाय भाजपा सरकार उन पर भारी ठंड में पानी की बौछार मारती है।
किसानों से सबकुछ छीना जा रहा है और पूंजीपतियों को थाल में सजा कर बैंक, कर्जमाफी, एयरपोर्ट रेलवे स्टेशन बांटे जा रहे हैं। #FarmersProtest pic.twitter.com/al8dG8ZZhi
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 26, 2020
पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकर्यांवर पाण्याचा मारा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हरियाणा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वॉटर ब्रिगेडची वाहने तैनात केली होती. ज्याद्वारे शेतकर्यांवर पाण्याचा वर्षाव करण्यात येत होता. परंतु या सर्व व्यवस्था शेतकऱ्यांसमोर अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. निषेध करणारे शेतकरी त्या बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आग्रा-ग्वॉल्हेर रोडवर शेतकऱ्यांनी ढिय्या आंदोलक सुरु केले आहे. शेतकर्यांच्या समर्थनार्थ दिल्लीला जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या मध्य प्रदेशातील शेतक्यांनी आग्रा-ग्वॉल्हेर रोडवरील सय्याजवळ धरणे सुरू केले आहे. यामुळे आग्रा-ग्वॉल्हेर मार्ग जाम झाला आहे. तसेच मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर यूपी पोलिसांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यानंतर संतप्त शेतक्यांनी हे धरणे सुरू केले.
शेतकऱ्यांनी डोक्यावर सामान घेऊन पुढे वाटचाल सुरु ठेवली आहे. आंदोलन करणार्या शेतकर्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनीही करनालमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी दिल्ली-चंदीगड हा हायवे बंद केला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली किंवा हिमाचल-पंजाबहून कर्नालला पोहोचलेल्या लोकांना माघारी जाण्यास भाग पाडले जात आहे. लोक सांगत आहेत की महामार्ग बंद करण्यापूर्वी प्रशासनाने प्रवाशांसाठी काही पर्यायी व्यवस्था केली असावी.