मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3 लाख 92 हजार 488 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 689 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कालच्या आकडेवारीनुसार संसर्गामुळे बरे झाल्या लोकांची संख्या 3 लाख 07 हजार 865 आहे. देशात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33 लाख 49 हजार 644 झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना कोरोना लसी देण्याची अत्यंत गरज निर्माण होऊ लागली आहे. कालपासून, देशभरात 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जर आपण कोरोना लसीच्या केंद्राचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
MyGov कोरोना हेल्पडेस्क आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल माहिती देणार आहे. MyGovIndia ने आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केले आहे की, यासाठी यूझरला 9013151515 वर नमस्ते पाठवावे लागेल. यानंतर चॅटबॉक्स तुम्हाला स्वत:हून प्रतिसाद देईल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळच्या कोविड लसीकरण केंद्राबद्दल माहिती मिळवू शकता. येथे तुम्हाला 6-अंकी पिन कोड देखील टाकावा लागेल.
Find your nearest vaccination center right here, through the MyGov Corona Helpdesk Chatbot! Simply type ‘Namaste’ at 9013151515 on WhatsApp or visit https://t.co/D5cznbq8B5. Prepare, don't panic! #LargestVaccineDrive #IndiaFightsCorona pic.twitter.com/qbfFlr5G0T
— MyGovIndia (@mygovindia) May 1, 2021
लसीकरण केंद्रांच्या यादीसह MyGovIndia च्या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला कोविड 19 लसीकरणासाठी नोंदणीची लिंक देखील मिळेल. ती आपल्याला थेट कोविनच्या वेबसाइटवर घेऊन जाईल. या वेबसाइटला भेट देऊन, आपण आपला फोन नंबर, ओटीपी आणि आयडी प्रूफ नंबर प्रविष्ट करुन नोंदणी करू शकता. याशिवाय आपण आरोग्य सेतु आणि कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग अॅपवर जाऊन देखील नोंदणी करू शकता.
हेल्प डेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु त्याची डीफॉल्ट भाषा इंग्रजीत आहे. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती हिंदीमध्ये संदेश पाठवून त्याला हिंदी भाषेत सेट करू शकते. MyGovIndiaने आपल्या ट्वीटर हँडलवर या विषयी माहिती दिली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे.
भारत सरकारने कोरोना व्हायरस संधर्भात चॅटबॉटती सुरवात 2020 मध्येच सुरू केली होती. हेल्पडेस्कच्या मदतीने, कोणालाही रीअल टाइममध्ये कोरोनाशी संबंधित माहिती मिळू शकते. प्रत्येक यूझरला हे व्हॉट्सअॅपवर विनामूल्य उप्लब्ध आहे.