कशी तयार होते भारताची 'Garud Commando Force', जाणून घ्या प्रशिक्षणापासून पगारापर्यंत सर्वकाही...

'टायगर फोर्स'च्या नावाने खास युनिट तयार करण्यात आलं. तेच आज गरुड कमांडो फोर्स या नावानं ओळखलं जातं. 

Updated: Feb 21, 2022, 05:03 PM IST
कशी तयार होते भारताची  'Garud Commando Force', जाणून घ्या प्रशिक्षणापासून पगारापर्यंत सर्वकाही...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या लष्कर, वायुदल आणि नैदलाव्यतिरिक्त्ही काही अशी संरक्षण दलं आहेत, ज्यांमध्ये सेवेत असणारे जवान सर्वस्व पणाला लावतात. अशा दलांमध्ये एनएसजी, एसएसएफ, मार्कोस आणि एसपीजी यांचा समावेश आहे. 

अशीच आणखी एक तुकडी म्हणजे 'गरुड कमांडो फोर्स'ची. देशातील सर्वात चाणाक्ष अशी संरक्षण तुकडी म्हणून 'गरुड कमांडो फोर्स'कडे पाहिलं जातं. 5 फेब्रुवारी 2004 ला याची सुरुवात झाली. 

2001 मध्ये जम्मू काश्मीर येथे दोन हवाई तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वायुदलानं एका खास तुकडीचा विचार केला. 

यामध्ये 'टायगर फोर्स'च्या नावाने खास युनिट तयार करण्यात आलं. तेच आज गरुड कमांडो फोर्स या नावानं ओळखलं जातं. 

काय काम करतं गरुड कमांडो फोर्स? 
ही तुकडी, एअरबॉर्न ऑपरेशन, कॉम्बेट सर्च अॅण्ड रेस्क्यू, काऊंटर इंसर्जेंसी ऑपरेशन, काऊंटर टेररिजम, डायरेक्ट अॅक्शन, फायर सपोर्ट, हॉस्टेज रेस्क्यू, एअर असॉल्ट, एअर ट्रॅफिक कंट्रोल, क्लोज क्वाटर कॉम्बॅट यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतं. 

कब हुई थी स्थापना?

कसं असतं प्रशिक्षण? 
सूत्रांच्या माहितीनुसार या जवानांसाठी 52 आठवड्यांची प्राथमिक प्रशिक्षण असतं. पुढे तीन महिन्यांच्या प्रशिक्षण काळासाठी उत्तमोत्तम जवान निवडले जातात. जवळपास अडीच वर्षे त्यांना कठोर प्रशिक्षण प्रक्रिया पार करावी लागते. 

मिझोरम येथील Counter-Insurgency and Jungle Warfare School येथे या जवानांना पाठवण्यात येतं. शिवाय त्यांना पॅराशूट ट्रेनिंगही देण्यात येते. 

सैन्याच्या या तुकडीकडे Glock 17 & 19 पिस्टल, कोल्ट M4 कार्बाइन, Tavor TAR-21 असॉल्ट राइफल, Beretta M9 अशी शस्त्रास्त्र असतात. 

खतरनाक हथियारों से होती है लैस

किती असतो पगार? 
या तुकडीला मिळणाऱ्या पगाराबाबत सांगावं तर, नौदलाच्या मार्कोस आणि लष्कराच्या पॅरा कमांडोंइतकांच त्यांचा पगार/वेतन असतं. पण, पदानुसार यामध्ये आकडा लहान मोठा होऊ शकतो. 

सद्यस्थितीला गरुड कमांडो फोर्समध्ये लेफ्टनंट पदासाठी 72 हजार रुपयांपासून 90,600 रुपये इतकं वेचन दिलं जातं. तर, उच्च पदावर असणाऱ्यांसाठी ही मर्यादा 2.5 लाखांपर्यंत असू शकते असं म्हटलं जातं.