नवी दिल्ली : २०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.
'ग्लोबल वॉर्मिंग'चे धोके किती गंभीर आहेत याची कल्पना देण्यासाठी आर्थिक सर्वेक्षणात एक स्वतंत्र प्रकरण छापण्यात आलं आहे.
या सर्वेक्षणात पुढे आलेल्या आकडेवारी नुसार येत्या पंचवीस वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशातील कृषी उत्पन्नात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता आहे.
आर्थिक सर्वेक्षणात १९७० ते २०१५ या काळातल्या तापमान वाढ आणि पर्जन्यमानातील घट याचा अभ्यास करण्यात आलाय.
या अभ्यासात गेल्या काही वर्षात कोरडवाहू शेतीतील उत्पन्न १५ ते २० टक्के घट झाल्याचं पुढे आलंय.
सर्वेक्षणाच्या पुढच्या अभ्यासातून सरकारला तातडीनं उपाय योजना करण्याचा सल्लाही देण्यात आलाय. त्याचप्रमाणे अतिसिंचन हादेखील पुढच्या काळातील धोका ठरू शकतो, असंही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटलंय.