Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. सोने- चांदीचे दरही घटले आहेत. 

Updated: Jul 6, 2022, 09:15 AM IST
Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

मुंबई : Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमती 8 टक्क्यांनी घसरल्याने एका बॅरलचा दर 105 डॉलरच्या जवळ गेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तर यासोबत सोने- चांदीचे दरही घटले आहेत. वायदे बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 800 रुपयांनी घसरला आहे. तसेचर एक किलो चांदीच्या दरमध्येही 1500 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे येत्या काळात सोनं-चांदी आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्या-चांदीच्या किंमतीतील वाढ सातत्याने सुरुच होती. ही वाढ थांबण्याचे नाव घेत नव्हती. आता सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी मोठी वाढ केल्यानंतर सोन्याच्या किमतीत दररोज वाढत होती. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशीही सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 52 हजारांचा पल्ला गाठला होता. एवढेच नाही तर सोन्याच्या फ्युचर्स किमतीने दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती.

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 22 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 48,100 आहे. तर 24 कॅरेट सोने 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 362 रुपयांनी वाढून 58,850 रुपये प्रति किलोवर पोहोचली.  

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय आहे?

जागतिक बाजारात सोने किमतीत वाढ झालेली पाहायला मिळत होती. अमेरिकन बाजारात सोने किंमत 1,811.38 डॉलर प्रति औंस आहे, तर चांदीची स्पॉट किंमत देखील आज 20.13 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. म्हणजेच आज आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किमतीही वाढत आहेत. मात्र, आता सोने- चांदीचे दरही घटले आहेत. 

तज्ज्ञ काय सांगतात?

सोन्याच्या किमतीबाबत तज्ज्ञांचे मतही येत आहे. येत्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. याशिवाय रशियाने G7 देशांना सोन्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात सोन्याच्या दरात कपात होण्याची शक्यता नाही. सोने दरात विक्रमी उच्चांकहोऊन  56,200 पर्यंत दर जाऊ शकतो.