मुंबई : 3 दिवस सतत भाव घसल्यानंतर आज सोन्याचा भाव वाढला आहे. दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोन्याचा भाव 230 रुपयांनी वाढला आहे. 3 दिवसापासून घसरत असलेला सोन्याचा भाव आज वाढला. पण चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने सोन्याचा भाव आज वाढल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत आज सोन्याचा भाव 32,090 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 40,700 रुपये प्रति किलो झाली. इटलीमध्ये राजकीय अस्थिरता आणि अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्धाची शक्यता वाढल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढला. सिंगापूरमध्ये मंगळवारी सोनं 0.09 टक्क्यांनी वाढलं आणि 1,298.40 डॉलर प्रति औंस झालं.
मागील तीन दिवसात सोन्याचा भाव 615 रुपयांनी कमी झाला होता. दूसरीकडे चांदी 200 रुपयांनी घसरली आहे.