Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम सराफा बाजारात नेहमीच दिसून येत असतात. यंदा जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 11 वेळा 63 हजारांवर पोहोचल्याचा दिसून आला. 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा (99.9% शुद्धता) दर 63 हजार रुपये असल्यास 3% GST सह किंमत 65 हजार रुपये होईल. सोन्याच्या दरवाढीमुळे गुंतवणुकदारांची खरेदी वाढली असल्याचे दिसून आले आहे.
जानेवारी महिन्यातील 18 तारखेला सोन्याचे दर 62,300 रुपये होते.. 1 ते 30 जानेवारी दरम्यान 62,300 ते 63,700 रुपयांच्या दरम्यान चढ-उतार होत राहिली. नवीन वर्षात 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,700 रुपये, 2 जानेवारीला 63,800 रुपये आणि 30 जानेवारीला 63,100 रुपये असेल. गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी सोने 63,800 रुपयांवर पोहोचले होते, हे विशेष. या कारणांमुळे फेब्रुवारी महिन्यात वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे, 1 जानेवारीला चांदीचा दर 74,300 रुपये प्रति किलो आणि 30 जानेवारीला तो 72,500 रुपयांवर घसरला. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे दर घसरल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
तर जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले असून दोन दिवसांत सोन्याच 320 रुपयांची वाढ झाली. 29 जानेवारीला 100 तर 30 जानेवारीला 220 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर जानेवारीत चांदी 4400 रुपयांनी घसरुन गेल्या आठवड्यात 1000 रुपयांची तर या आठवड्यात 500 रुपयांची वाढ झाली आहे. सोमवार, 29 जानेवारी रोजी 200 रुपयांची तर 30 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली आहे. आज (31 जानेवारी) एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.
घरबसल्या तुम्हाला सोने चांदीचे दर कळू शकतात. यासाठी तुम्हाला 8955664433 वर मिस कॉल देऊन सर्व्ह कॅरेटची किंमत जाणून घेऊ शकतात.