तीन महिन्यानंतर पुन्हा सोन्याने गाठला उच्चांक दर, खरेदी करण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा उच्चांकी दरवाढ झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 24, 2025, 11:07 AM IST
तीन महिन्यानंतर पुन्हा सोन्याने गाठला उच्चांक दर, खरेदी करण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर title=
gold price hits record high retail price above 82,900 rs MCX check gold silver Price

Gold Price Today: तीन महिन्यानंतर सराफा बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक मोडला आहे. MCXवर भाव 80 हजारांच्या वर पोहोचला आहे. काही दिवसांतच सोनं 83 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. MCXवर सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. तर, कॉमेक्सवर $ 2780 रुपयांवर पोहोचले आहे. आत्तापर्यंत सोनं 4 टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. 

शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 304 रुपयांच्या तेजीने 79,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत. काल 79,626 वर स्थिरावले होते. चांदी या दरम्यान 756 रुपयांच्या तेजीसह 91,905 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. काल 91,149 रुपयांवर स्थिरावली आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली असून 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून 82,420 रुपये प्रति तोळा आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचे दर 61,820 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  75, 550 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  82, 420 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,820 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,555 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,242 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 182 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   60,440रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   65,936रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    49,456 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  75, 550 रुपये
24 कॅरेट-   82, 420 रुपये
18 कॅरेट-  61,820 रुपये