मुंबई : सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदार नेहमीच गुंतवणूक करीत असतात. तसेच भारतातील अनेक सण उत्सवांमध्ये सोन्याला मागणी असते. त्यामुळे सध्या सोन्याचे दर किती याबाबत रिटेल तसेच गुंतवणूकदारांमध्ये कुतूहल असते.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याची किंमत 47 हजार 386 रुपये प्रति तोळे इतकी होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात होत असलेली वाढ अचानक थांबली आणि सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली.
गेल्या वर्षी कोरोना काळात ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 55 हजाराच्या वर गेले होते. त्यापार्श्वभूमीवर अद्यापही सोने 7 ते 8 हजार प्रतितोळे स्वस्त मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या दरांमध्ये वाढ दिसून येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
22 कॅरेट 46 हजार 386 प्रतितोळे
24 कॅरेट 47 हजार 386 प्रतितोळे
मुंबईतील चांदीचा आजचा दर 66 हजार 785 रुपये प्रति किलो.
मुंबईतील आजच्या सोन्याच्या दरांमध्ये प्रतितोळे 200 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. या आठवड्याची सुरूवात सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीने झाली होती.