मुंबई : Gold Silver Price: जागतिक बाजारातून मिळालेल्या वाईट संकेतांमुळे सोने आणि चांदी महाग झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वस्त होत आहेत. या क्रमाने आज सोन्याचा दर 3 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. याआधी सोने 56,000 रुपये प्रति तोळेच्या पातळीवर गेले होते. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल, तर आजचे दर जाणून घ्या
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24-कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, जी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. त्याचवेळी चांदीचा भावही 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळे इतके होते. चांदीचा दर 61,900 रुपये प्रति किलो इतका होता. त्यामुळे सोने-चांदीचे दागिने विकत घेण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी सराफा व्यवसायीकांकडे ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोन्याच्या दरांनी 56 हजार रुपये प्रति तोळे रुपयांची उच्चांकी गाठली आहे.
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेच्या सराफा बाजारातही सोन्याचा भाव 0.3 टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.