नवी दिल्ली : दसऱ्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. सोन्याच्या किंमतीत २५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३०७५० रुपये प्रति ग्रॅम झाला आहे.
केवळ सोनचं नाही तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली असल्याने चांदी ४०५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
स्थानिक ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्या मागणीत घट झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं कळतयं. ऐन सणासुदीच्या काळात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही एक चांगली संधी आहे.