मुंबई : Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात तेजी आली असून, आज मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात 409 रुपयांची वाढ झाली. MCX वर, आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सोने 52588 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर चांदी 1011.0 रुपयांच्या वाढीसह 68305 प्रति किलोवर ट्रेड करीत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
सराफा बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 48868 रुपये प्रति तोळे तर, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,450 रुपये इतका आहे.
तर मुंबईत चांदीचा दर 68,100 रुपये प्रति किलो इतका आहे.
वाढत्या महागाईच्या काळातही देशात सोने खरेदीची क्रेझ कमी झालेली नाही. 2021-22 च्या पहिल्या 11 महिन्यांत देशातील सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलर झाली आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत सोने आयातीचा आकडा 26.11 अब्ज डॉलर इतका होता.