Trending News : बिस्किट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. गरमा गरम चहासोबत बिस्किटची मजाच काही और असते. अशात कुठलं बिस्टिक हवं म्हटलं तर Parle-G हे अगदी सगळ्यांचा तोंडातील नाव. भारतात एकही असं घर सापडणार नाही ज्या घरात Parle-G खाल्ला जात नाही. असं म्हणतात Parle-G हे गरीबांचं बिस्किट आहे. हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त बिस्किट कोणी श्रीमंत व्यक्ती खाताना तुम्हाला दिसला तर? अशाच एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
इंडिगो एयरलाइंसचे को-फाउंडर आणि एमडी राहुल भाटिया असं या व्यक्तीचं नाव आहे. राहुल भाटिया विमान प्रवासात चहा आणि 5 रुपयाच्या Parle-G बिस्किटचा आनंद घेताना दिसले. उद्योगपती राहुल भाटिया Parle-G बिस्किट मस्तपैकी चहात बुडवून खाताना दिसले. गरीबाचं हे बिस्किट येवढ्या श्रीमंत माणसाच्या हातात दिसल्यावर तर चर्चा रंगणारच ना. फोर्ब्सच्या माहितीनुसार राहुल भाटिया आणि त्यांचे वडील कपिल भाटिया यांच्याकडे 38,000 कोटींची मालमत्ता आहे. याचा अर्थ Parle-G ची टेस्ट इतकी भारी आहे की, ते खाण्यापासून कोणीही राहू शकत नाही.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं होतं. तेव्हा Parle-Gने एक नवा इतिहास रचला होता. लॉकडाऊनच्या काळात Parle-Gची प्रचंड विक्री झाली होती. विशेष म्हणजे त्यांचा 82 वर्षांचा रेकॉर्ड Parle-Gने मोडला आहे. 1939 साली पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बिस्किटची सुरुवात झाली. कमी किंमत आणि चांगल्या क्वालिटीमुळे कमी वेळात हे बिस्किट प्रत्येकांचं आवडतं बिस्किट झालं.