नवी दिल्ली : जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय. मात्र पुढच्या काही महिन्यात जीएसटीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम याँग किम यांनी व्यक्त केला आहे.
जीएसटी मुळे देशभरातून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान जागतिक बॅंकेच्या अध्यक्षांच्या या वक्तव्याने केंद्र सरकारला तुर्तास दिलासा मिळाला आहे.
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या संयुक्त परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
गेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. कॉंग्रेस , शिवसेना या पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते.