नवी दिल्ली : जगातील सर्वात लांब केस असलेल्या मुलीने हेअरकट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आहे. निलांशी पटेल असे तिचे नाव असून ती भारतीय आहे. गेल्या वर्षीच 18 वर्षाच्या निलांशी पटेलने जगातील सर्वात लांब केसांचा स्वतःचा जुना गिनीज रेकॉर्ड मोडला होता. निलांशी ही गुजरातच्या मोडसा येथे राहते. तिचे केस 6 फूट तीन इंच इतके होते. खूप वर्षांनी तिने केस कापले आहेत. guinnessworldrecords ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय.
नीलांशीने 12 वर्षांनंतर केस कापलेयत. वयाच्या 6 व्या वर्षी घडलेल्या एका घटनेमुळे तिने केस न कापण्याचा निर्णय घेतला होता. 6 वर्षाची असताना न्हाव्याने तिचे केस व्यवस्थि कापले नव्हते. यापुढे आपण कधी केस कापणार नसल्याचा निश्चय तिने त्यावेळी घेतला. केसांची काळजी घेतली. अनेक रेकॉर्ड तिच्या नावावर झाले.
6 ऑगस्ट 2002 रोजी रोजी जन्मलेल्या निलांशीच्या नावाची नोव्हेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद झाली. इटलीतील एका कार्यक्रमात तिच्या केसांची लांबी पाच फुट सात इंच नोंदवली गेली. त्यावेळी तिने अर्जेंटिनातील किशोरवायीन मुलीचा रेकॉर्ड मोडला. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये 6 फूट 3 इंच वाढलेल्या केसांनी तिचे नाव पुन्हा गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.
आपले लांब केस जमिनीपासून दूर ठेवण्यासाठी निलांशी हाय-हील सँडल घालते. निलांशी बहुतेक वेळा वेणी बांधते. पण स्पोर्ट्स एक्टीव्हीटी आणि पोहण्याच्या दरम्यान ती केस बांधायची. पण आता निलांशीचे केस कापल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय.