गांधीनगर : MLA Jignesh Mevani to 3-month jail in 2017 case : गुजरात न्यायालयाने आमदार जिग्नेश मेवाणी यांना एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे आता त्यांना तीन महिने जेलमध्येच काढावे लागणार आहे. 2017 मध्ये 'आझादी मोर्चा' काढल्याबद्दल तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. (Gujarat court sentences Independent MLA Jignesh Mevani to 3-month jail in 2017 case)
गुजरातमधील मेहसाणा येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज गुरुवारी अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना 2017 मध्ये परवानगीशिवाय 'आझादी मोर्चा' काढल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात मेवाणी यांच्याशिवाय नऊ जणांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
दोषी आढळलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या रेश्मा पटेल आणि मेवाणी यांच्या राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या काही सदस्यांचा समावेश आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे ए परमार म्हणाले की, मेवाणी आणि इतर नऊ जण भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 143 अंतर्गत बेकायदेशीर सभेचा भाग असल्याबद्दल दोषी आहेत.