मुंबई : सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक असणार आहे. सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक केले आहे. 1 जून नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीये. भारतीय मानक ब्यूरोने सर्व ज्वेलर्सना याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सोन्याची शुद्धता ही तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट असे 3 टप्पे असणार आहेत.
सोन्यासाठी हॉलमार्किंग हे त्याच्या शुद्धतेचे प्रमाण असते. सध्या ते अनिवार्य नव्हते. पण आता ते आवश्यक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्वेलर्स असोसिएशनच्या मागणीनुसार 1 जून 2021 पर्यंत वाढ देण्यात आली होती. भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होते. भारतात दरवर्षी सुमारे 700-800 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत, ज्वेलर्स बीआयएसच्या ए अँड एच सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि तिची गुणवत्ता तेथे तपासतात. निकालानुसार, बीआयएस त्याला चिन्हांकित करते.
बीआयएसकडे नोंदणी प्रक्रिया ज्वेलर्ससाठी अधिक सोपी केली गेली आहे. हे काम आता घरूनही करता येईल. यासाठी www.manakonline.in या संकेतस्थळावर जा. येथे, ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे ती सबमिट करायची आहेत आणि नोंदणी फी जमा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार बीआयएसचा नोंदणीकृत ज्वेलर बनतो.
BIS नोंदणी फीसुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी असेल तर यासाठी नोंदणी फी 7500 रुपये आहे, जर उलाढाला 5 कोटी ते 25 कोटी दरम्यान असेल तर फी 7500 रुपये असेल आणि 25 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असेल तर फी 40 हजार रुपये असणार आहे. 100 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांसाठी फी 80 हजार रुपये असणार आहे.