मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य फोटो व्हायरल होत असतात. ओळखा पाहू, हा फोटो कुठला, ओळखा पाहू हे ठिकाण कुठलं वगैरे वगैरे असे असंख्य कॅप्शन या फोटोंना दिले जातात. अशा या फोटोंच्या गर्दीत सध्या सर्वांच्या नजरा अशा एका फोटोवर खिळल्या आहेत ज्यानं अनेकांना चक्रावून सोडलं आहे.
एका वन्यजीव छायाचित्रकारानं हा टीपलेला एक फोटो नेटकरी आव्हान म्हणून पाहत आहेत.
आपली दृष्टी किती तीक्ष्ण आहे, याचीच ते परीक्षा घेत आहेत. ही परीक्षा म्हणजे फोटोमध्ये बिबट्या कुठे दिसतो का हे शोधण्याची.
सोशल मीडियावर हा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे. पण, त्यामध्ये जवळपास 99 टक्के लोकांना कुठेही बिबट्या दिसत नाहीये.
पण, जर का तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नसाल तर मात्र निरीक्षणानं आणि अर्थातच तीक्ष्ण नजरेनं तुम्ही या बिबट्याला पाहू शकता.
मिळतोय का तुम्हाला बिबट्या?
नाही? काहीच हरकत नाही, फोटोमध्ये हा बिबट्या जिथं बर्फ संपतो आणि दगड- बर्फाच्या मध्ये एक खाच तयार होते तिथेच हा बिबट्या लपलेला आहे. पर्वताच्या एका टोकाशी तो सहजपणे दिसत आहे.
बघा, मित्रमैत्रीणींची निरीक्षण करणाऱ्याची क्षमता नेमकी किती पक्की आहे... घ्या त्यांची परीक्षा!