HDB Financial IPO: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे. म्युच्यूअल फंड, इक्विटी अशा विविध माध्यमातून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मोठ्या कंपनीच्या आयपीओची वाट पाहत असतात. या माध्यमातून कमी कालावधीत चांगली कमाई करण्याची संधी गुंतवणूकदारांकडे असते. खासगी क्षेत्रातील दिग्गज बॅंक एचडीएफसीची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ येणार आहे. तुम्ही शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करत असाल तर तुम्ही याकडे संधी म्हणून पाहू शकता.एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेसने 12 हजार 500 कोटी रुपयांची आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.
HDFC बँकेची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस आयपीओद्वारे 12,500 कोटी रुपये उभारणार आहे. यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. बुधवारी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे ही कागदपत्रे दाखल करण्यात आली. सध्या, एचडीएफसी बँकेची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) शाखा असलेल्या HDB फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 94.36 टक्के हिस्सेदारी आहे.
कंपनीने ताज्या इश्यूमधून मिळालेले पैसे टियर-1 भांडवली पाया मजबूत करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. भविष्यातील भांडवलाच्या गरजांसाठी, व्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त कर्ज याचा यात समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑक्टोबर 2022 च्या आदेशानुसार HDB फायनान्शियल सर्व्हिसेस सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये उच्च-स्तरीय NBFCs स्टॉक एक्सचेंजमध्ये तीन वर्षांच्या आत सूचीबद्ध करणे आवश्यक आहे.
या महिन्यात, HDFC बँकेच्या संचालक मंडळाने 12 हजार 500 कोटी रुपयांच्या शेअर विक्रीला मान्यता दिली होती. ज्यात तिच्या उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित 10,000 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश आहे. प्रस्तावित IPO नंतर HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस लागू नियमांच्या तरतुदींचे पालन करून बँकेची उपकंपनी बनून राहील. या आयपीओ बाजारात आल्यावर तुम्ही यासाठी बोली लावण्याचा विचार करु शकता.