Himachal Pradesh Uttarakhand Rain : महाराष्ट्रात सुरु झालेला मान्सून सध्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये व्यापत असतानाच तिथं देशाच्या विविध भागांमध्ये त्याची हजेरी पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर, पावसानं रौद्र रुप दाखवल्यामुळं या भागांमध्ये नद्यांचे प्रवाह अतिप्रचंड वेगानं वाहू लागले आहेत. तिथं उत्तराखंडमध्येही ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं चारधाम यात्रेवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचं प्रमाण पाहता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून या राज्यांसाठी रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे.
#WATCH | Himachal Pradesh | Several vehicles washed away in heavy rainfall and damaged in Mohal, Kullu last night. The vehicles were retrieved with the help of a JCB vehicle. pic.twitter.com/pBMkehdML6
— ANI (@ANI) June 25, 2023
#WATCH | Himachal Pradesh | Flash flood witnessed in Bagi, Mandi following incessant heavy rainfall here. pic.twitter.com/EvWKyQefgG
— ANI (@ANI) June 25, 2023
Himachal Pradesh | Heavy rainfall in Mandi district leads to landslide on Chandigarh-Manali highway near 7 Mile; causes heavy traffic jam pic.twitter.com/GfFtAcR9O5
— ANI (@ANI) June 26, 2023
हिमाचलमध्ये सध्या पर्यटनाचे दिवस सुरु असले तरीही इथं पावसामुळं बरीच संकटं ओढावताना दिसत आहेत. शिमलातील रामपूर येथे असणाऱ्या सरपारा गावात ढगफुची झाल्यामुळं अनेर घरांचं नुकसान झालं. तर, मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 बंद करण्यात आला. अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळं हिमाचल प्रदेशातील बरेच रस्ते बंद करण्यात आले, तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याच्याही घटना घडल्या.
कुल्लू येथे झालेल्या भूस्खलनामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दुतर्फा लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अद्यापही हिमाचलमधील परिस्थिती नियंत्रणात आली नसल्यामुळं पर्यटकांनी सुरक्षित स्थळी थांबावं अशा सूचना प्रशासनानं केल्या आहेत.
तिथे उत्तराखंडमध्ये सध्या सुरु असणाऱ्या पावसामुळं चारधाम यात्रेदरम्यान गौरीकुंड आणि केदारनाथच्या पायवाटेवर गदेरा उफाळून वाहत आगे. ज्यामुळं केदारनाथ मंदिराच्या दिशेनं निघालेल्या भाविकांची वाट अडली आहे. गौरिकुंड येथेही अडकलेल्या काही भाविकांना बचाव पथकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केलं आहे. मुसळधार पावसामुळं टिहरी, पौडी, देहरादून आणि नैनीताल भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.