Supreme Court On Hindu Marriage: हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा किंवा जेवणाचा दारू पिण्याचा कार्यक्रम नाही. त्याची पवित्रता लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त रजिस्ट्रेशन केल्याने लग्न वैध होत नाही. विवाह पूर्ण होण्यासाठी मंत्रोच्चार व सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
हिंदू विवाह वैध ठरवण्यासाठी सप्तपदी, मंत्रोच्चार सारखे संस्कार आणि सोहळे होणे गरजेचे आहे. आवश्यक विधी झाले नाही तर तो विवाह अमान्य ठरवण्यात येईल. नोंदणी केली तरी हे विवाह वैध राहणार नाहीत. तसंत, वाद-विवादाच्या प्रकरणात असे विधी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. याला भारतीय समाजात एक महान मुल्य म्हणून दर्जा दिला जातो. यामुळं युवा पुरुषांना आणि महिलांना आग्रह केला जातो की विवाह संस्थेत प्रवेश करण्याआधी यावर गांभीर्याने विचार करावा आणि भारतीय समाजात विवाह संस्था किती पवित्र आहे, यावर विचार करावा.
लग्नात नाच-गाणं, दारू पिणे- जेवण याचे आयोजन करणे. तसंच, दबाव टाकून हुंडा व भेटवस्तुंची मागणी करणे याचा सोहळा नाहीये. त्यामुळं एखादा अपराध झाला तरी कारवाई होई शकते. हा भारतीय समाजातील एक महत्त्वाचा समारंभ आहे. या समारंभाद्वारे स्त्री आणि पुरुष यांच्यात एक विशिष्ट नातं तयार होतं, त्यांना पती-पत्नीचा दर्जा दिला जातो.
खंडपीठाने म्हटलं आहे की, हिंदू मॅरेज अॅक्टअंतर्गंत सेक्शन 8 अंतर्गंत लग्नाची नोंदणी करणे गरजेचे आहे. तसंच, सेक्शन 7अंतर्गंत हिंदू रिती-रिवाजांनी लग्न करणेहेदेखील गरजेचे आहे. सेक्शन 5 मध्ये नमूद करण्यात आले आहे की, सेक्शन 7मधील तरतुदींनुसार विवाह परंपरा आणि विधींनुसार झाला पाहिजे. हिंदू रिती-रिवाजानुसार विवाह झाला नाही तर असा विवाह हिंदू विवाह मानला जाणार नाही.