मुंबई : नोकरी सुरू केल्यानंतर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, तुम्हाला गृह कर्ज घेण्याची गरज पडू शकते. अनेकदा तुमचा पगार (CTC)चांगला असूनही पुरेशा रकमेचे कर्ज दिले जात नाही.
गृहकर्ज हे इन हॅंड सॅलरीवर अवलंबून असते. जर तुमचा CTC जास्त आहे परंतु टेक होम सॅलरी तेवढी जास्त नाही तर तुम्हाला कर्ज तुलनात्मकतेने कमी मिळेल.
या बाबींवर गृह कर्ज मिळते.
गृह कर्ज अनेक बाबींवर अवलंबून असते. यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय, मासिक उत्पन्न, मागील कर्ज, क्रेडिट स्कोअर, नोकरीची स्थिती आणि क्रेडिट हिस्ट्री बाबत बँक माहिती घेते. याआधारावर तुम्हाला किती कर्ज देता येईल हे निश्चित होते.
इन हॅंड सॅलरीवर कर्ज
कर्मचाऱ्यांचा पगार 6 खर्चांपासून मिळून बनवला जातो. यामध्ये बेसिक सॅलरी, मेडिकल अलाउंस, लीव ट्रॅ्व्हल अलाउंस, हाउस रेंट अलाउंस आणि अन्य अलाउंस सामिल आहेत.या 6 खर्चांनी मिळून CTC बनतो.
तुमच्या खात्यात दर महिन्याला जी रक्कम जमा होते ती तुमची नेट सॅलरी असते. ही रक्कम पीएफ, टीडीएस आणि अन्य कपात कापल्यानंतर बनते. त्याच आधारावर गृह कर्ज किती देता येईल हे बँक निश्चित करते.
किती मिळणार गृह कर्ज
गृह कर्ज देताना बँका नेट सॅलरीची माहिती घेतात. नेट सॅलरीच्या 60 पट रक्कम कर्ज म्हणून दिली जाऊ शकते.
जर तुमची नेट सॅलरी 35000 आहे तर बँक तुम्हाला 25.5 लाख रुपये कर्ज मिळू शकते. 50 हजार असेल तर 38 लाख, 60 हजार असेल तर 46.5 लाखापर्यंत लोन मिळू शकते.