मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी गृहकर्ज, वाहन कर्ज आणि गृहकर्जाचे दरही वाढवले आहेत. रेपो रेट लिंक्ड लोन रेट (RLLR) आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्यात आली. तुम्हाला जर होमलोन घ्यायचं असेल तर कोणत्या बँकेचं घ्यावं? कोणती बँक किती व्याजदर देते याबाबत जाणून घेऊया.
ICICI Bank | या बँकेनं व्याजरात वाढ केली आहे. आता व्याजदर 8.60 टक्के असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकते. यासाठी 7.60-8.5 व्याजदर वार्षिक असणार आहे.
Bank Of Baroda | ही बँक 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते. यावर 7.45 ते 9.20 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. याचा अवधी 30 वर्षांपर्यंत आहे. पगारदार व्यक्तीसाठी व्याज दर 7.45-8.80 टक्के असणार आहे. नोकरी न करणाऱ्या व्यक्तीला 7.55-8.90 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.
SBI | देशातील सगळ्यात सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचं व्याजदर सगळ्यात कमी होतं. मात्र आता यावेळी वाढवण्यात आलं आहे. 15 जूनपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. 7.55-855 पर्यंत होमलोनवर व्याजदर लावलं जातं.
HDFC Bank | HDFC गृहकर्जाचे व्याज 7.55 टक्क्यांपासून सुरू होतं. HDFC 10 कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज देते. याचा कालावधी 30 वर्षांपर्यंत असतो. महिलांसाठी 30 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देते. महिलांना 7.65-8.15 आणि इतरांना 7.70 ते 8.20 टक्के व्याजदराने लोन दिलं जातं. 30 ते 75 लाख लोनवर वेगळा व्याजदर लावण्यात आला आहे. त्यासाठी 7.90 ते 8.40 तर इतरांना 7.95 ते 8.45 टक्क्यांने व्याजासकट पैसे भरावे लागणार आहे.
30 लाखांपर्यंत कर्ज देते आणि 30 वर्षांपर्यंत परतफेड कालावधी आहे. Paisabazaar.com नुसार, बँका पगारदार/नॉन-वर्किंग प्रोफेशनल्ससाठी 30 लाखांपर्यंतचे गृहकर्ज महिलांना 7.65%-8.15% आणि इतरांना 7.70%-8.20% दराने देतात. 30 ते 75 लाखांपर्यंतची कर्जे महिलांना 7.90%-8.40% आणि इतरांना 7.95%-8.45% गृहकर्ज दर देतात. त्याचप्रमाणे, 75 लाखांवरील गृहकर्ज महिलांना 8.00%-8.50% आणि इतरांना 8.05%-8.55% गृहकर्ज देतात.
Axis Bank | अॅक्सिस बँकेच्या गृहकर्जाचे व्याज दर 7.60 टक्के आहे. अॅक्सिस बँक 5 कोटींपर्यंत कर्ज देतं. त्याचा कालावधी 30 वर्षापर्यंत ठेवता येतो. 7.60 ते 12.50 पर्यंत एक्सिस बँकेच्या गृहकर्जाचे फ्लोटिंग रेट आहेत. नोकरदारांसाठी 7.60 - 7.95 टक्के दरवर्षी तर व्यवसाय किंवा नोकरी न करणाऱ्यांसाठी दर 7.70 – 8.05 टक्के फ्लोटिंग तर 12.00 टक्के फिक्स व्याजदर भरावं लागणार आहे. आहे.