Viral Video : रेल्वे स्थानकांवर कायम घोषणा करण्यात येते चोरांपासून सावधान. तुमचं सामानाची काळजी घ्या. पण कोण जाणे कसं काय चोरी तुमच्याजवळील सामन असो किंवा तुमच्या खिशातील मोबाईल असो लपांस करतात. कधी हातातील मोबाईल हिसकावून चोर सुसाट पळतात. तर काही वेळा धावत्या ट्रेनमधून सामन चोरून चोरटे उड्या मारतात. (How a mobile phone robbed at railway stations from cctv video captures live theft video get viral trending today)
प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्टेशनवर ट्रेनला उशिर झाल्यास प्रवासी तिथे झोपतात. अशा वेळी चोरचे प्रवाशांच्या सामान्याची चोरी करतात. पोलीस बंदोबस्त असतानाही चोर सहज चोरी करुन पोबारा करतात. तुमच्या खिशातील मोबाईल कसा चोरीला जातो हे दाखविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोक जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. एका व्यक्तीच्या बाजूला एक व्यक्ती झोपल्याचं नाटक करत आहे. तो अधून मधून उठून इकडे तिकडे पाहत आहे. अतिशय हुशारीने तो झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात हात घालतो आणि मोबाईल काढतो. हे करत असताना तो डोके हळूच वर करुन इकडे तिकडे पाहतो. जेणेकरुन कोणाला त्याच्यावर संशय येऊ नये.
पुढच्याच क्षणी हा चोर चतुराईने तिथे झोपलेल्या व्यक्तीच्या जीन्सच्या खिशातून फोन काढण्यात यशस्वी होतो. हा सर्व प्रकार रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कैद झाला आहे.
दरम्यान आरपीएफ इंडियाने हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यांनी चोरट्याला गजाआड केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ते म्हणाले की, रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या प्रवाशांना टार्गेट करणार्या एका सराईत चोराला त्यांनी पकडले आहे. हा चोर लोकांचे फोन चोरत होता, त्याला तिथे लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
Using CCTV footage, #RPF Howrah nabbed a sneaky thief who was targeting sleeping passengers & swiping their phones.
Stay one step ahead of pickpockets. Keep your valuables secure & stay alert in crowded places.#OperationYatriSuraksha #StayAlert #StaySafe pic.twitter.com/LYo4bR2wRV
— RPF INDIA (@RPF_INDIA) August 27, 2023
त्याशिवाय प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तूची काळजी घेण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचा सल्ला आरपीएफने दिला आहे.