मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांसाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या भामट्यांचीही कमी नाही. त्यामुळे योग्य आणि खऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची ओळख असणे गरजेचे आहे.
योग्य रेमडेसिवीरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट केले आहे. रेमडेसिवीरच्या ओळखीसाठी त्याची तुम्हालाही मदत होईल.
Attention!!
Lookout for these details before buying Remdesivir from the market. pic.twitter.com/A2a3qx5GcA— Monika Bhardwaj (@manabhardwaj) April 26, 2021
देशात काही ठिकाणी रेमडेसिवीरच्या नावाखाली बनावट इंजेक्शन औषध विकले गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बारामतीत देखील बनावट इंजेक्शन बनवल्यामुळे दोघा तरुणांना अटक झाली होती.
देशात आणि राज्यात या घटना अत्यंत अपवादात्मक असल्या तरी, फसवणुक टाळण्यासाठी योग्य औषधं - इंजेक्शनची आपल्याला माहिती हवी.