नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा मंडळाची (LIC) पॉलिसी खरेदी केल्यानंतर अनेकांना त्यांच्या फीचर्सबद्दल माहिती नसते. नंतर पॉलिसी आपल्या उपयोगाची नसल्याचे लक्षात आल्यावर, पॉलिसी बंद करावी वाटते. परंतु एलआयसी पॉलिसीला सरेंडर करण्याबाबत काही नियमावली निश्चित कऱण्यात आली आहे.
जाणून घ्या नियम ?
1. गॅरेंटीड सरेंडर वॅल्यू (GSV)
याअंतर्गत पॉलिसी होल्डर आपली पॉलिसीच्या 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच सरेंडर करू शकतात. याचाच अर्थ 3 वर्षापर्यंत प्रीमियम देय आवश्यक ठरते. जर तुम्ही 3 वर्षानंतर सरेंडर केली. तर पहिल्या वर्षात भरलेल्या प्रीमियम वगळता उर्वरीत प्रीमियमच्या 30 टक्के वॅल्यू ही सरेंडर वॅल्यू असू शकते. जेवढी उशीरा पॉलिसी सरेंडर केली तेवढी सरेंडर वॅल्यू अधिक मिळते.
2 स्पेशल सरेंडर वॅल्यू
यासाठी एक विशेष सुत्र वापरले जाते सूत्र वापरले जाते. त्यानुसार तुम्ही किती काळानंतर पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला सरेंडर वॅल्यूची रक्कम मिळते. हे निश्चित केले जाते.
सरेंडर वॅल्यू?
जीवन विम्याच्या बाबतीत पूर्ण अवधी होण्याच्या आत पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला प्रीमियमच्या स्वरूपात भरलेल्या रकमेचा काही हिस्सा परत मिळतो. यामध्ये चार्जेस कपात केले जातात. या रक्कमेला सरेंडर वॅल्यू असे म्हणतात.
पॉलिसी सरेंडर केल्यानंतर काय होते?
एलआयसी पॉलिसी सरेंडर केल्यानंतर जीवन विमा सुरक्षा संपुष्टात येतो. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत मिळणारी कर सूट बंद होते.