श्रीनगर: केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यास संपूर्ण देश पेटेल, असे वक्तव्य राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. त्यांनी सोमवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यातील कलम ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली. मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर अगोदरच दारुगोळ्याच्या कोठारावर बसला आहे. जर कलम ३७० रद्द झाले तर फक्त काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देश पेटेल. त्यामुळे भाजपने विस्तवाशी खेळ करू नये, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.
Mehbooba Mufti on BJP in manifesto promises abrogation of Article 370 and annulling Article 35A: Already J&K ek barood ki dher par baitha hua hai. If this happens then not only Kashmir but the country and the region will burn. So I appeal to BJP that please stop playing with fire pic.twitter.com/E0z8rmjNO5
— ANI (@ANI) April 8, 2019
भाजप 'कलम ३७०' आणि '३५ ए' रद्द करण्यासाठी आग्रही आहे. भाजपकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात तसे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
'कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो'
या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही केंद्र सरकाराला इशारा दिला होता. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना आणून वसवण्याचा विचार काहीजण करत आहेत. जेणेकरून आमची लोकसंख्या कमी होईल, असे त्यांना वाटते. हे सर्व सुरु होताना आम्ही काय झोपून राहणार का? आम्ही याचा मुकाबला नक्की करू. ३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार? कदाचित अल्लाहचीच इच्छा असेल की आम्ही त्यांच्यापासून स्वतंत्र व्हावे. आम्ही पण बघतोच तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० कसे रद्द करता? मग तुमचा झेंडा फडकावयला कोण तयार होते, हे मी बघतोच. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्याने तुम्ही आमचे हदय तोडाल, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.