मुंबई : नोकरी करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज होम लोन मिळून जातो. पण जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला होम लोन मिळणं थोडं कठीण होतं. पण आता होम लोन मिळणं सहज शक्य झालं आहे. होम लोन घेण्याकरता नोकरी करणारी व्यक्ती आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला नियम सारखेच आहेत. फक्त फरकच एवढाच आहे की, होम लोन घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोन घेणाऱ्या व्यक्तीचा पगार आणि कर्ज चुकवण्याची मुदत.
होम लोन घेण्यासाठी नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे कंपनीकडून प्रमाण पत्र मिळणं गरजेचं असतं. तसेच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अनेक पेपर्स द्यावे लागतात. स्वरोजगार करणाऱ्या व्यक्तीला इनकम टॅक्स रिटर्नमुळे होम लोणं मिळणं शक्य होतं. होम लोन घेण्यासाठी कमीत कमी वय 24 वर्षे असणं गरजेचं असतं. वयाच्या 60 वर्षापर्यंत होम लोन भरू शकता.
होम लोन कुणालाही मिळू शकतं पण याकरता तुमचा महिन्याचा पगार आणि तुमचं क्रेडिट प्रोफाइल पाहिलं जातं. पगारावरून तुम्ही लोन भरू शकाल की नाही याची कल्पना येते. तसेच क्रेडिट प्रोफाइलवरून कळतं की, तो पगार तुम्ही भरण्याचे इच्छुक आहात की नाही. नोकरदार वर्गाला होम लोनकरता तीन महिन्याची सॅलरी स्लिप, सहा महिन्यांच बँक स्टेटमेंट, नवीन वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न आणि अपॉइमेंट लेटर या कागद पत्रांची आवश्यकता असते. तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा इनकम टॅक्स रिटर्न, ऑडिटर्सकडून बॅलेन्स शीट आणि इनकम स्टेटमेंट, दुकान असल्यास त्याचे पेपर,महत्वाचे लायसन्स यासारख्या गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच शिक्षण आणि कोणतं शास्त्रशुद्ध ज्ञान घेतलं असेल तर त्याचे महत्वाचे पेपर देणे देखील आवश्यक आहे.