मुंबई : नोटी या एका विशिष्ट प्रकारच्या कागदापासून बनलेले असताता. पैसे देण्यासाठी आपण नोटीपासून देवाणघेवाण करतो. ज्यामुळे सारखे वापले गेल्याने नोटा झिझणाच्या आणि फाटण्याच्या समस्या येतात. परंतु एकदा का नोट फाटली की, त्याला दुकानदार घेत नाही. त्यामुळे फाटलेल्या नोटा कोणाकडे असतील तर लोकांना आपली नोट चालणार नाही याचं टेन्शन येतं. परंतु तुमच्याकडेही जर अशा नोटा असतील तर टेन्शन घेऊ नका. या नोटा तुम्ही बँकेतून सहज बदलू शकता. जुन्या किंवा खराब नोटा बॅकेकडून बदलल्या जाऊ शकतात.
तुमच्याकडे फाटलेल्या नोटच्या भागानुसार बँक तुम्हाला पैसे परत करते. कधीकधी नोटा चुकून फाटल्या जातात. त्याच वेळी, बहुतेक जुन्या नोटा भिजल्यामुळे देखील फाटल्या जातात. जर तुमच्याकडे देखील अशा नोटा आहेत, तर जाणून घ्या की तुम्ही त्यांना बँकेतून कसे बदलू शकता.
RBI च्या मते, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा स्वीकाराव्या लागतात. म्हणून, आपण जवळच्या बँक शाखेला भेट देऊन सहजपणे नोटा बदलू शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच, त्यासाठी त्या बँकेचे ग्राहक असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन ते बदलू शकता.
जुने चलन बदलणे बँकेवर अवलंबून आहे की, ते बदलावे की नाही. यासाठी कोणताही ग्राहक बँकेला सक्ती करू शकत नाही. बँक नोट घेताना, हे तपास जाते की ती नोट मुद्दाम फाडलेली नाही ना? याशिवाय नोटेची स्थिती कशी आहे? त्यानंतरच बँक ती बदलून देते. जर नोट बनावट नसेल आणि त्याची स्थिती थोडी ठीक असेल, तर बँक ती सहज बदलून देते.
परंतु काही परिस्थितींमध्ये नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जळालेल्या, जास्त फाटलेल्या किंवा तुकडे झालेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात. त्याच वेळी, अशा नोटांचा वापर करुन, तुम्ही तुमचे बिल किंवा टॅक्स बँकांमध्ये भरू शकता. याशिवाय बँकेत अशा नोटा जमा करून तुम्ही तुमच्या खात्याची रक्कम देखील वाढवू शकता.
आरबीआयच्या नियमांनुसार 1 रुपयापासून 20 रुपयांपर्यंतच्या नोटांमध्ये अर्धे पैसे देण्याची तरतूद नाही. या प्रकरणात पेमेंट पूर्ण केले जाते. त्याचबरोबर 50 ते 2000 रुपयांच्या नोटात अर्धे पैसे देण्याची तरतूद आहे. अशा स्थितीत जर कमी शेअर असेल, तर तुम्हाला नोटचे अर्धे मूल्य दिले जाते.