मुंबई : भारतातील बर्याच राज्यात सणाच्या हंगामामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या पाच आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
5 राज्यांमध्ये 49.4% रुग्ण
आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, गेल्या 24 तासांत एकट्या केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत 49.4 टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. उत्सवाचा हंगाम देखील याला एक मोठे कारण असू शकते. आरोग्य सचिव म्हणाले, ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही या राज्यांच्या सरकारांशी सतत बोलत आहोत.
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 58 टक्के रुग्ण हे पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून, कोविड 19 चा मृत्यूचा आलेख भारतात कमी झाला आहे. कोरोना भारतात अजूनही पसरत असल्यामुळे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत.
कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा युरोपियन देशांमध्ये विनाश पाहायला मिळत आहे. युरोपच्या देशांमध्ये, कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. याबाबत माहिती देताना नीती अयोगचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, 'हा साथीचा रोग युरोपमधील बर्याच देशांमध्ये खूप वेगाने वाढताना दिसत आहे.'
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, युरोपियन देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक दिसत आहे. लोक आजाराच्या संकटाला तोंड देत आहेत. येथे पुन्हा एकदा महामारी शिगेला पोहोचली़ आहे. अमेरिकेत, कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अमेरिकेत सध्या कोरोनाचे 28 लाखांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.