नवी दिल्ली : अनुच्छेद 370 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तान याचा विरोध करत आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. एलओसीवर देखील तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानने सीमेवर लष्कराची संख्या वाढवली आहे. तर लद्दाखच्या समोर एअरबेसवर लढाऊ विमान तैनात केले आहेत.
पाकिस्तानी लष्कराच्या या तयारीनंतर भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं की, 'आम्ही ही अलर्ट आहोत. जर एलओसीवर ते येत असतील तर त्यांना उत्तर मिळेल.'
जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर बिपिन रावत यांनी म्हटलं की, काश्मिरी लोकांसोबत आमची बोलणं सामान्य आहे. आम्ही त्यांना बंदुकीशिवाय भेटतो. आम्हाला आशा आहे की, यापुढे ही बंदुकीविनाच भेटत राहू.'
पाकिस्तानी पत्रकार हामिद मीरने दावा केला आहे की, हत्यारांसह पाकिस्तानी लष्कर लाइन ऑफ कंट्रोल (LoC) च्या दिशेने पुढे जात आहे. हामिद मीरने ट्विट केलं आहे की, पाक अधिकृत काश्मीरमधील अनेक मित्रांनी फोन करुन सांगितलं आहे की, हत्य़ारांसह पाकिस्तानी सेना एलओसीवर येत आहे.
हामिद मीर या पाकिस्तानी पत्रकारने म्हटलं आहे की, पीओेकेमध्ये लोकं पाकिस्तानी सेनेचं स्वागत करत आहेत. पण पाकिस्तानकडून याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. याबाबत पुष्टी देखील झालेली नाही.
जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद-370 हटवल्यानंतर पाकिस्तान याला विरोध करत आहे. जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थन मागत आहे. पण कोणताच देश पाकिस्तानच्या बाजुने उभा राहत नाही आहे.