Shocking Story : विमान प्रवासादरम्यान अपघाताच्या आणि प्रवाशांना हृद्यविकाराचा (cardiac arrests) झटका आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये प्रवाशांना वाचवणे ही मोठी कसरत असते. कारण इतक्या उंचावर डॉक्टर मिळणे खूप अवघड असते. त्यात एखादा प्रवाशीच डॉक्टर (Indian origin doctor) निघाला तर सुदैवाणे प्राण वाचतात देखील. मात्र या घटना खूप धक्कादायक असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका डॉक्टराने हजारो फुट उंचावर एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहे.डॉक्टराच्या या कामगिरीनंतर आता सर्वदूर कौतूक होत आहे.
विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाला हृद्यविकाराचा झटका (cardiac arrests) आला होता. या झटक्यामुळे तो विमानात पडला होता. या घटनेनंतर कॅबने क्रूने प्रवाशांकडेच मदतीची याचना केली होती. विमानात कोणी डॉक्टर असेल तर त्याने मदतीस यावे असे आवाहन त्यांनी केले होते. कॅबने क्रूचा आवाज ऐकूण भारतीय वंशाचे डॉ. विश्वराज वेमला यांनी मदतीसाठी धाव घेतली होती.
कॅबिन क्रूचा आवाज ऐकूण डॉ. विश्वराज वेमला (Dr Vishwaraj Vemala) रूग्णाजवळ पोहोचले होते. मात्र त्यांच्याजवळ रूग्णाच्या तपासणीसाठी लागणारी उपकरणेच नव्हती. त्यामुळे त्यांनी कॅबिन क्रूकडे आपत्कालीन वैद्यकीय वस्तू घेतल्या आणि काही प्रवाशांकडून गोळा केल्या होत्या. या वस्तू घेऊन त्याने प्रवाशाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत प्रवाशाला पहिल्यांदा सूरूवातीला हृद्यविकाराचा झटका आला होता, त्यानंतर दुसऱ्यांदा त्याचे प्राण वाचवताना त्याला हृद्यविकाराचा झटका आला होता.मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून प्रवाशाचे प्राण वाचवले होते.
डॉ. विश्वराज वेमला (Dr Vishwaraj Vemala) यांना प्रवाशाला वाचवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली होती. कारण विमानात रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक वस्तू नव्हत्या. डॉ. वेमला यांनी केबिन क्रूला काही औषध आहेत का? अशी विचारणा केली. सुदैवाने, त्याच्याकडे एक आपत्कालीन किट होते. या किटमध्ये काही औषधे होती. तसेच ऑक्सिजन आणि स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर व्यतिरिक्त, तो कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी बोर्डवर इतर कोणतेही उपकरण नव्हती.त्यामुळे डॉक्टरांनी प्रवाशांकडून काही उपकरणे मागवली होती. प्रवाशांशी बोलल्यानंतर डॉ. वेमला यांना हृदय गती मॉनिटर, रक्तदाब मशीन, पल्स ऑक्सिमीटर आणि ग्लुकोज मीटर मिळाले. ही उपकरणे घेऊन त्यांनी साधारण 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कसे बसे रूग्णाचे प्राण वाचवले होते.
दरम्यान डॉ. विश्वराज वेमला (Dr Vishwaraj Vemala) यांच्या रुग्णालयाने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बर्मिंगहॅम यांनी ट्विटरवर लिहिले: "आमच्या सल्लागार हेपॅटोलॉजिस्टपैकी डॉ. विश्वराज वेमला यांनी विमान प्रवासा दरम्यान दोनदा हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले. आपत्कालीन स्थितीत डॉ. वेमला यांनी प्रवाशाला जिवंत केले.
Dr Vishwaraj Vemala, one of our consultant hepatologists, saved the life of a passenger who suffered two cardiac arrests mid-flight. With limited supplies, Dr Vemala was able to resuscitate him before handing over to emergency crews on the ground.
: https://t.co/VFOAa1VQyU pic.twitter.com/EXEg9Udujj— University Hospitals Birmingham (@uhbtrust) January 3, 2023
खरं तर हे विमान युनायटेड किंगडमवरून थेट बंगळूरू जाणारे होते. मात्र प्रवाशाची बिकट अवस्था पाहून त्याला मूंबईत उतरवण्यात येणार होते. मला आठवतंय जेव्हा आम्ही ऐकलं की, आम्ही मुंबईत उतरू शकतो, तेव्हा आम्हा सर्वांसाठी ते खूप भावनिक होतं. तो माझ्याशी बोलू शकला होता. मी त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आग्रह धरला असे डॉक्टराने सांगितले. या घटनेनंतर रुग्णाने डोळ्यात अश्रू आणून डॉक्टरांचे आभार मानले असेही डॉ.वेमला (Dr Vishwaraj Vemala) यांनी सांगितले.
दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरच्या (Dr Vishwaraj Vemala) कामगिरीचे कौतूक होत आहे. तसेच ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.