नवी दिल्ली : ज्या कंपन्यांनी ५ वर्षात सर्वाधिक संपत्ती निर्माण केली त्या टॉप १० कंपन्यांची यादी समोर आली आहे.
भारतातल्या १०० मातब्बर कंपन्यांनी गेल्या ५ वर्षात ३८.९ लाख कोटी रुपयांची मालमत्ता निर्माण केली आहे. यात टाटा गृपच्या टीसीएसने ( टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) सलग पाच वर्ष नंबर वन स्थान पटकावलं आहे.
मोतीलाल ओसवाल या आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीने या संदर्भातल्या त्यांच्या वार्षिक अहवालात ही यादी दिली आहे. टीसीएसने २०१२ ते २०१७ या पाच वर्षात २.५० लाख कोटींची मालमत्ता निर्माण केली आहे.
भारताच्या सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या टॉप १० कंपन्यांची यादी अशी आहे.
रँक कंपनीचं नाव संपत्ती ( रुपये/अब्जांमध्ये)
१ टीसीएस २,४९९
२ एचडीएफसी २,३१५
३ रिलायन्स इंडस्ट्रीज १,८८८
४ आयटीसी १,५९४
५ मारुती सुझुकी १,४१३
६ एचडीएफसी १,३५०
७ आयओसीएल १,२१९
८ हिंदूस्थान युनीलिव्हर १,०८१
९ कोटक महिंद्रा बँक १,०५०
१० एचसीएल टेक्नॉलॉजीस ८८४