मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेतात काही तासांत चक्रीवादळ 'जवाद'चा धोका आहे. याच्या तिव्रतेची लक्षणे लक्षात घेता हावामान विभागाकडून अलर्ट वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत जवाद चक्रीवादळाच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्व किनारपट्टी रेल्वेने ३ आणि ४ डिसेंबरसाठी गाड्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे या दोन्ही दिवसात धावणाऱ्या अप आणि डाऊन अशा 95 गाड्या रद्द करण्यात आहे आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, चक्रीवादळ जवादच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 95 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. साहू म्हणाले की, ईस्ट कोस्ट रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्या आणि या भागातून जाणाऱ्या अप आणि डाऊन गाड्यांसह 95 गाड्या 3 आणि 4 डिसेंबरसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
साहू यांनी स्पष्ट केले की, ईस्ट कोस्ट रेल्वे लोकांना चक्रीवादळामुळे रद्द झालेल्या गाड्यांबद्दल सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे माहिती देतआहे. तसेच जवाद चक्रीवादळाचा प्रभाव अधिक तीव्र झाल्यास आणखी काही गाड्या रद्द होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुरीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्स्प्रेस, निलांचल एक्स्प्रेस, नंदनकानन एक्स्प्रेस, तसेच भुवनेश्वर ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन गाड्यांचा समावेश आहे.
वादळामुळे गाड्यांचा मार्ग बंद होण्याची ही सहा महिन्यांत दुसरी वेळ आहे. यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'यास' चक्रीवादळामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता 'जवाद' वादळाचा धोका लक्षात घेता ईस्ट कोस्ट रेल्वेने सध्या 95 गाड्या रद्द केल्या आहेत. चक्रीवादळाचा प्रभाव तीव्र झाल्यास आणखी काही गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात.
अंदमान समुद्राजवळ उगम पावलेल्या चक्रीवादळाचा यावेळी बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावर परिणाम होत आहे. अशा स्थितीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचण्याची शक्यता आहे. रेल्वे सिग्नलिंग सेवेसह इतर उपकरणांवर परिणाम होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे विजेचे खांबही खराब होऊ शकतात. त्यामुळेच खबरदारी म्हणून रेल्वेने वादळग्रस्त रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्या आधीच रद्द केल्या आहेत.