नवी दिल्ली : भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिला आहे. आयएसआयने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये जैश आणि आयएसआयमध्ये गुप्त बैठक झाली. पाकिस्तानची आयएसआय ही जैश आणि तालिबानला एकत्र आणण्याच्या तयारीत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. यामुळे काश्मीरमध्ये पुलवामासारखे हल्ले घडू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बालाकोट येथे घडवलेल्या हल्ल्यानंतर मसूद अजहर खूप सक्रीय झाला आहे. जैशच्या दहशतवाद्यांसोबत बसून तो आणखी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा अहवाल आहे. गेल्या 17 वर्षात मी कधी आजारी पडलो नाही किंवा रुग्णालयात भरतीही झालो नाही असे यावेळी मसूदने सांगितले. माझ्या आजारापणा बद्दल खूप अफवा पसरवल्या जात असल्याचेही ते म्हणाले. बहावलपूर येथे जैशची गुप्त मिटींग झाली. यामध्ये पुलवामा सारखा हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या सर्व घटनांमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाचाही काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.
मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे असा ठराव संयुक्त राष्ट्र संघात भारतातर्फे मांडला जातोय. या अनेक देशांचा पाठींबा देखील आहे. पण चीन यामध्ये आडकाठी आणत आहे. जोपर्यंत मसूद अजहर आमि जैशवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत भारतावर दहशतवादी हल्ल्याचे सावट राहणार आहे.