श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय. हे दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं समजतंय. सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळलं. सुरक्षा दलाकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
#UPDATE Encounter in Shopian's Memander area: Two terrorists have been neutralised. Combing operation is underway. #JammuAndKashmir pic.twitter.com/cRVtd0mDtm
— ANI (@ANI) February 27, 2019
मिमेंदर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर भारताच्या सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं होतं. सुरक्षा दलानं घेरल्यानंतर रात्रीपासून दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता. त्याला शोपियामध्ये गेल्या दोन-तीन तासांपासून सुरू असलेला हा गोळीबार आता थांबला असला तरी अवचित घटनांचा धोका मात्र कायम आहे.
Jammu & Kashmir: Visuals from Memander area of Shopian district where an encounter had started earlier today. Firing has stopped now. Search operation is underway. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ZXhPpmDHLJ
— ANI (@ANI) February 27, 2019
मंगळवारी भारतीय सेनेनं सीमेपार पाकिस्तानी गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या पलिकडील पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्यदलालाही फटका बसलाय. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीनजिक १२ ते १५ चौक्यांवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी सेना सीमानजिक गावांतील नागरिकांना कवच म्हणून वापरत आहे. त्यांच्या घरात लपून पाकिस्तान सेनेकडून गोळीबार सुरू आहे.