शोपियाँमध्ये पुन्हा धुमश्चक्री, सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झालीय.

Updated: Nov 25, 2018, 09:08 AM IST
शोपियाँमध्ये पुन्हा धुमश्चक्री, सहा दहशतवाद्यांचा खात्मा  title=

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झालीय. या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय. इथल्या बटागुंड परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून भारतीय जवानांनी या परिसराला घेरलं. दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबार केला.

शोध मोहिम सुरू 

या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय.

यापैकी चौघांचे मृतदेह सापडेलत तर अन्य दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे लष्कराकडून इथं शोध मोहीम सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. भारतीय जवानांनी ३ दिवसांत बारा दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.