Jammu Kashmir Snowfall Video : कडाक्याच्या थंडीनं देशभरात चांगलाच जोर धरलेला असताना जम्मू काश्मीर क्षेत्राचं रुपडं पालटलं आहे. काश्मीर प्रांतामध्ये तूफान बर्फवृष्टीला सुरुवात झाली असल्यामुळं इथं लक्ष जाईल तिथंतिथं बर्फाचीच चादर पाहायला मिळत आहे. यादरम्यानच काश्मीर भागामध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रांवरील गस्त वाढवण्यात आली असून सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
काश्मीरमधील खोऱ्याच्या क्षेत्रामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली असली तरीही इथं काही भाग मात्र अद्यापही बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे, असं असलं तरीही या बर्फवृष्टीचं स्वागत मात्र काश्मिर प्रांतातील स्थानिकांनी आणि इथं येणाऱ्या सर्वांनीच उत्साहात केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jammu & Kashmir Tourism च्या X अकाऊंटवरून नुकतेच काही व्हिडीओ शेअर करण्यात आले असून, तिथंही बर्फाच्छादीत काश्मीरची झलक पाहण्यासाठी पर्यटकांना जणू आमंत्रित केलं जात आहे. अवघ्या 39 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये काश्मीरच्या बर्फापासून तिथं मिळणाऱ्या हरिसा, स्थानिक पद्धतीनं बनलव्या जाणाऱ्या इतर खाद्यपदार्थांची झलक पाहायला मिळत आहे. कडाक्याची थंडी आणि समोर येणारा वाफाळता हरिसा हा पदार्थ म्हणजे खऱ्या अर्थानं काश्मीरच्या थंडीला 'चार चाँद' लागले, असं म्हणणं गैर ठरणार नाही. एकिकडे काश्मीर प्रांत अनेस समस्यांना तोंड देत असला, इथं दहशतवाद्यांची वक्रदृष्टी कायम असली तरीही त्यांच्यावर लष्कराची नजर असून पर्यटकांसाठी मात्र इथं येण्याच्या वाटा खुल्या आहेत, हेच हे व्हिडीओ लक्षात आणून देत आहेत.
Chilly winter mornings are all about freshly baked local breads and piping hot Harissa, a winter delicacy made with lamb cooked overnight with spices.Experience this culinary delight on your next trip to J&K. #jammukashmir #food #harissa #downtown #srinagar #culinary #winter pic.twitter.com/VCLSdl46VY
— Jammu & Kashmir Tourism (@JandKTourism) November 26, 2024
Winter is here. #JammuAndKashmir #tourism #winter #WinterMagic #WinterWonderland #snow #snowfall #Snowbreak #holidays #travel #kashmir #gulmarg #pahalgam #patnitop #sonamarg #kashmir #JammuKashmir @diprjk pic.twitter.com/FUsMzokUaH
— Jammu & Kashmir Tourism (@JandKTourism) November 23, 2024
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काश्मीरमधील बर्फवृष्टीसाठीचा योग्य काळ असून, इथं डिसेंबर महिन्यापर्यंत बर्फाची सुरेख चादर पाहायला मिळते. फेब्रुवारीपर्यंत काश्मीरमध्ये बर्फवृष्टी चालूच असल्यामुळं तुम्हाला इथं अविश्वसनीय दृश्य पाहायला मिळतील.
काश्मीरमध्ये आलं असता गुलमर्ग, दल लेक, सोनमर्ग, पहलगाम, गुरेझ व्हॅली अशा ठिकाणांना भेट देता येते. काश्मीरचं एक वेगळं रुप या ठिकाणांवर येऊन अनुभवता येतं. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळं काश्मीरमधील बर्फवृष्टीच्या प्रमाणात काहीशी घट झाली असली तरीही जेव्हाजेव्हा इथं बर्फाची चादर तयार होते तेव्हातेव्हा स्थानिकांचा उत्साह मात्र पाहण्याजोगा असतो. मग तुम्ही कधी जाताय काश्मीरच्या सफरीला?