"मला स्पर्श करू दे, तुला पास करेन"; विद्यार्थिनीकडे शिक्षकाने केली अश्लील मागणी, Video Viral

Jaunpur, viral video : विद्येच्या मंदिरात शिक्षकाने अशा प्रकारची मागणी केल्याने एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थिनीने मोठ्या धीराने शिक्षकाचे कृत्य मोबाईलमध्ये कैद केले आहे. आता पोलिसांत हे प्रकरण गेल्याने काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आकाश नेटके | Updated: May 26, 2023, 06:01 PM IST
"मला स्पर्श करू दे, तुला पास करेन"; विद्यार्थिनीकडे शिक्षकाने केली अश्लील मागणी, Video Viral title=

Crime News : उत्तर प्रदेशातील (UP News) जौनपूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीकडून अश्लील मागणी केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थिनीला शारिरीक संबंध ठेव तुला पास करतो अशी मागणी करणाऱ्या नराधाम शिक्षकाचे कृत्य कॅमेरात कैद झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. जौनपूरच्या टीडी कॉलेजमधील (TD College Jaunpur) इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप सिंग यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे केवळ महाविद्यालयच नाही तर संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाला धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. प्रदीप सिंग हे  एका अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अत्यंत निर्लज्जपणे अश्लील बोलताना दिसत आहे. यासोबत विद्यार्थिनीवर चुंबन आणि शारिरीक संबंधासाठी दबाव टाकतानाही दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थीनीने मोठ्या धाडसाने शिक्षकाच्या अश्लिल मागणीचा गुपचूप व्हिडिओ बनवला आणि त्याचा पर्दाफाश केला. आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही वेळातच कॉलेज प्रशासनानेही कारवाई केली आणि डॉ. प्रदीप सिंग यांची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

डॉ. प्रदीप सिंग या शिक्षकाने याआधीही असे लज्जास्पद कृत्य केले होते. याचा संशय विद्यार्थिनीला आला होता. त्यामुळे डॉ. प्रदीप सिंगने विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावल्यानंतर तिने मोबाईल रेकॉर्डिंग चालू केले होते. त्यानंतर शिक्षक जे काही बोलले ते रेकॉर्ड करण्यात आले. या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीला सेक्स करण्याची ऑफर दिली होती. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही, असेही तो विद्यार्थिनीला सांगत होता. विद्यार्थिनी मात्र शिक्षकांच्या मागणीला सतत नकार देत होती.

शिक्षकावर कारवाईची मागणी

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कॉलेजचे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना घेराव घालत कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता संताप पाहून महाविद्यालय प्रशासनाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी कसेबसे कारवाईचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना शांत करण्यात यश मिळवले. मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

कॉलेजने काय म्हटलं?

या प्रकरणाची माहिती देताना प्राचार्य आलोक कुमार सिंह यांनी सांगितले की, "प्रदीप कुमार सिंह हे इतिहासाचे शिक्षक आहेत. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याची दखल घेत कॉलेजच्या मेल आयडीवरून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अतिशय लाजिरवाणा आहे. वस्तुस्थितीच्या आधारे जी काही कायदेशीर कारवाई होईल."